Weekly Horoscope 31 March To 6 April 2025: नवीन आठवडा 31 मार्च ते 6 एप्रिल 2025 सुरु झाला आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. मार्च महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - तूळ राशीच्या लोकांचे जोडीदाराशी वाद कमी होतील, वैवाहिक जीवनात आनंद राहील.
करिअर (Career) - नोकरदारांना व्यवसायात समस्या निर्माण होऊ शकतात, नोकरीत समस्या येऊ शकतात.
आर्थिक स्थिती (Wealth) - बुधवार-गुरुवारी खर्च वाढू शकतात आणि मानसिक चिंता राहील. अपेक्षित मदत मिळणार नाही. शुक्रवार-शनिवारी प्रयत्नांना यश मिळेल, योजना फलदायी होतील आणि उत्पन्न वाढेल
आरोग्य (Health) - या आठवड्यात वाताचे विकार, मानदुखी, पायाला दुखापत, अपचन होऊ शकते.
वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - जोडीदाराची वागणूक गोड राहील, अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.
करिअर (Career) - हा आठवडा व्यवसायात सुधारणा होईल, नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - उत्पन्न वाढेल आणि बुधवार-गुरुवारी चांगली बातमी मिळेल. शुक्रवार-शनिवार पुन्हा चिंता आणू शकतात, खर्च वाढतील, परंतु प्रयत्न यशस्वी होतील.
आरोग्य (Health) - या आठवड्यात सर्दी, घसा खवखवणे, शुगर आणि ब्लड प्रेशर यासारख्या समस्या उद्भवू शकतात आणि मूळव्याधची समस्या देखील संभवते.
हेही वाचा>>
30 मार्च तारीख नशीब पालटणारी! 'या' 5 राशींच्या आयुष्यात येईल मोठं वळण, आनंदाची बातमी मिळेल, बक्कळ पैसा..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)