Weekly Horoscope : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भरभराटीचे! धनवान होतील राशी; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 30 June To 06 July 2025 : जुलैचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल यासाठी जाणून घेऊयात 5 भाग्यवान राशींचे साप्ताहिक राशीभविष्य.

Continues below advertisement

Weekly Horoscope 30 June To 06 July 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जुलैच्या नव्या आठवड्यात शुभ धन लक्ष्मी योग तयार होईल. त्यामुळे लक्ष्मी योगाचे शुभ योग तयार होईल. ग्रहांच्या या शुभ स्थितीमुळे, 5 राशीच्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. या राशींना केवळ करिअरमध्ये यश मिळणार नाही तर मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता देखील असेल. जुलैचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल यासाठी जाणून घेऊयात 5 भाग्यवान राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope).

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी नवीन आठवडा आत्मविश्वासाचा असणार आहे. तुमच्यात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल. तसेच, उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होईल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांसाठी नवीन आठवडा फार चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, नवीन गोष्टी शिकाल. टीमवर्कमध्ये काम कराल. पैसे गुंतवण्यासाठी हा काळ फार चांगला असणार आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या दरम्यान अनेक नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तसेच, सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, वैवाहिक जीवन तुमचं सुरळीत चालेल. तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करता येईल. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीसाठी नवीन आठवडा फार खास असणार आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक बदल घडताना दिसतील. तसेच, करिअरच्या बाबतीत तुम्ही नवीन ध्येय गाठाल. जुन्या सर्व गोष्टी विसरुन नवीन गोष्टीची सुरुवात कराल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची स्थिरता दिसून येईल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी जूनचा नवा आठवडा आर्थिक बाबतीत चांगला असणार आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असेल. तसेच, तुम्हाला भौतिक संपत्तीचा लाभ घेता येईल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करता येतील. लवकरच तुमचे प्रवासाला जाण्याचे योग जुळून येणार आहेत. मित्रांचा तुम्हाला सपोर्ट मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मकतेचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. तुमच्या भावनांवर तुमचं नियंत्रण राहील. तसेच, तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नवीन आठवड्यात तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल. कामाच्या निमित्ताने नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :   

Angarak Yog 2025 : जुलैच्या सुरुवातीलाच वाढणार संकटांचा डोंगर; बनतोय भयानक 'अंगारक योग'; 'या' राशींसाठी पुढचे 28 दिवस कष्टाचे

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »