ट्रेंडिंग
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींचे जूनच्या नव्या आठवड्यात नशीब पालटेल! मोठं सरप्राईझ मिळणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope 2 To 8 June 2025: तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Weekly Horoscope 2 To 8 June 2025: मे महिन्याचा नवीन आठवडा 2 ते 8 जून लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. त्यामुळे मे महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - लव्ह लाईफच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, प्रेम संबंधांमध्ये रोमांस आणि आकर्षण दोन्ही राहतील. तुमच्या जोडीदारासाठी वेळ काढल्याने नाते मजबूत होईल. वैवाहिक जीवनात काही कटुता शक्य आहे, परंतु संवादातून तोडगा निघेल. तुम्हाला कुटुंबातील ज्येष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता तुम्हाला कामाच्या ठिकाणी विशेष ओळख देईल. उच्च पदाकडे वाटचाल करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकता. परंतु जवळच्या व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवल्याने नुकसान होऊ शकते, व्यावसायिक निर्णय हुशारीने घ्या
आर्थिक स्थिती (Wealth) - हा आठवड्यात आर्थिक बाबींमध्ये हुशारीने गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा मिळेल. प्रलंबित कामांना गती मिळेल.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आरोग्य सामान्य राहील, परंतु उष्णता आणि उष्माघात टाळणे महत्वाचे आहे. थकवा आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. नियमित दिनचर्या आणि योगासने तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या आठवड्यात, नातेसंबंधांमध्ये स्पष्टता आणि संवाद आवश्यक आहे. तुम्ही भावना व्यक्त करण्यास संकोच करू शकता, ज्यामुळे अंतर वाढू शकते. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या लागतील. कौटुंबिक बाबींमध्ये संतुलन राखावे लागेल.
करिअर (Career) - या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्यांचे आणि कठोर परिश्रमाचे पूर्ण फळ मिळू शकेल. विश्लेषणात्मक विचार आणि समज तुमच्या बाजूने काम करेल. नोकरी करणारे लोक मोठ्या प्रकल्पाचा भाग बनू शकतात. व्यवसायात नफ्याच्या संधी आहेत, विशेषतः जर तुम्ही अकाउंटिंग, तांत्रिक किंवा वैद्यकीय क्षेत्रात असाल तर
आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात तुम्हाला आर्थिक नफा आणि प्रगती मिळेल. नवीन प्रकल्पांमध्ये तुम्हाला यश मिळेल.
आरोग्य (Health) - आरोग्याबद्दल जास्त काळजी केल्याने तुम्हाला मानसिक थकवा येऊ शकतो. पुरेशी झोप घ्या आणि तुमच्या आहारात फायबर आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. त्वचेची अॅलर्जी किंवा पोटाची समस्या असू शकते.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी जूनचा पहिलाच आठवडा टेन्शनचा की भाग्याचा? कसा जाणार आठवडा? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)