Numerology: 10 वी चा निकाल लागला, आता करिअर कशात करणार? तुमच्या जन्मतारखेनुसार निवडा शाखा, आयुष्यात यश मिळेल भरभरून
Numerology: अंकशास्त्रानुसार, 10 वी च्या निकालानंतर जीवनात यश मिळण्यासाठी तुमच्या जन्मतारखेवरून तसेच मूलांकावरून कोणती शाखा निवडाल? जाणून घ्या

SSC Result 2025: आज महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकालानंतर करिअर कशात करायचं? त्यासाठी शाखा कोणती निवडावी? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. आज आम्ही तुम्हाला जीवनात यश मिळण्यासाठी अंकशास्त्रानुसार, तुमच्या जन्मतारखेवरून तसेच मूलांकावरून कोणती शाखा निवडाल? याबाबत डॉ भूषण ज्योतिर्विद हे अंकशास्त्रानुसार अधिक माहिती देत आहेत.
मूलांक कसा शोधायचा?
मूळ क्रमांक म्हणजेच मूलांक शोधणे खूप सोपे आहे. तुमचा मूलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज. उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म 23 तारखेला झाला असेल, तर 2+3 = 5, आणि हा तुमचा मूलांक क्रमांक आहे. जर तुमचा जन्म कोणत्याही तारखेला झाला असेल, तर त्या तारखेचे अंक जोडून ते एका अंकात रूपांतरित करा. जर तुमचा जन्म 29 तारखेला झाला असेल, तर 2+9 = 11, आणि नंतर 1+1 = 2, म्हणजे तुमचा मूळ क्रमांक 2 असेल.
प्रत्येक मूलांकानुसार कोणती शाखा निवडाल?
अंकशास्त्रानुसार, मूलांक (मूळ संख्या) हा तुमच्या जन्मतारखेचा एक अंक असतो, जो 1 ते 9 या दरम्यान येतो. हा अंक तुमच्या व्यक्तिमत्त्वावर तसेच संभाव्य करिअर निवडीवर प्रभाव टाकतो असं अंकशास्त्र (Numerology) मानतं. त्यामुळे प्रत्येक मूलांकानुसार कोणती शाखा (career/education stream) निवडावी हे सांगितलं आहे:
मूलांक 1 (लीडर)
स्वभाव: नेतृत्वक्षम, आत्मविश्वासी, स्वतंत्र विचार
शाखा: प्रशासन, व्यवस्थापन, इंजिनिअरिंग, उद्योजकता, संरक्षण (सैन्य), सिव्हिल सर्व्हिसेस
मूलांक 2 (सहकार्य)
स्वभाव: भावनिक, संवेदनशील, शांत
शाखा: मानसशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षण, नर्सिंग, कलाक्षेत्र (arts), काऊंसिलिंग
मूलांक 3 (सर्जनशीलता)
स्वभाव: आनंदी, कल्पक, सर्जनशील
शाखा: मीडिया, लेखन, अभिनय, शिक्षण, फॅशन डिझायनिंग, कम्युनिकेशन
मूलांक 4 (शिस्तप्रिय)
स्वभाव: मेहनती, प्रॅक्टिकल, स्थिर
शाखा: अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग), अकाउंटिंग, IT, टेक्निकल फील्ड
मूलांक 5 (स्वतंत्रता)
स्वभाव: उत्साही, जिज्ञासू, संवादप्रिय
शाखा: ट्रॅव्हल, मास कम्युनिकेशन, मार्केटिंग, सेल्स, पत्रकारिता, भाषा
मूलांक 6 (सेवा व कला)
स्वभाव: प्रेमळ, जबाबदार, सुंदरतेकडे आकर्षण
शाखा: डिझायनिंग, फॅशन, इंटेरिअर, आर्ट, हेल्थकेअर, शिक्षण
मूलांक 7 (गूढता व संशोधन)
स्वभाव: अंतर्मुख, विचारशील, गूढ
शाखा: संशोधन, विज्ञान, मानसशास्त्र, आध्यात्म, फिलॉसॉफी, डेटा सायन्स
मूलांक 8 (शक्तिशाली)
स्वभाव: धाडसी, धोरणात्मक, कठोर
शाखा: लॉ, प्रशासन, फायनान्स, बिझनेस, पॉलिटिक्स, पोलिस/सुरक्षा सेवा
मूलांक 9 (योद्धा)
स्वभाव: धाडसी, संवेदनशील, मदतीस तत्पर
शाखा: संरक्षण सेवा (सैन्य/पोलिस), NGO, डॉक्टर, क्रीडा, समाजसेवा
हेही वाचा:
Shani Jayanti 2025: फक्त 7 मिनिटांचा महायोग ठरणार गेमचेंजर, शनिदेव 'या' राशींचे नशीबाचे चक्र फिरवणार! अच्छे दिन येणार, बक्कळ पैसा असेल
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
