Shani Jayanti 2025 : शनी जयंतीला जुळून आले दुर्लभ योग; शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय करा, आयुष्यभर ऐटीत जगाल
Shani Jayanti 2025 : शनी जयंतीच्या दिवशी सुकर्मा योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शिवास योगाचा शुभ संयोग जुळून येणार आहे.
Shani Jayanti 2025 : वैदिक पंचांगानुसार, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी शनि जयंती (Shani Jayanti) साजरी केली जाणार आहे. यंदा 27 मे 2025 रोजी म्हणजेच मंगळवारच्या दिवशी शनी जयंती आहे. धर्मशास्त्रानुसार, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी न्यायदेवता शनीचं अवतरण झालं होतं. यंदा शनी जयंतीच्या दिवशी सुकर्मा योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शिवास योगाचा शुभ संयोग जुळून येणार आहे. तसेच, करिअरमध्ये प्रगतीसह धनयोग देखील जुळून येणार आहे.
शनी जयंती 2025 (Shani Jayanti 2025)
वैदिक पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्या तिथी 26 मे रोजी दुपारी 12 वाजून 11 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 27 मे रोजी सकाळी 8 वाजून 31 मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल. मात्र, उदय तिथीनुसार, पाहायचं झाल्यास, ज्येष्ठ अमावस्या मंगळवारी म्हणजेच 27 मे रोजी साजरी केली जाणार आहे.
ट्रेंडिंग
शनी जयंतीला जुळून आले शुभ योग
शनी जयंतीच्या दिवशी अनेक शुभ योग जुळून येणार आहेत. हा योग पाठ-पूजा करण्यासठी फार शुभ मानला जाणार आहे. पंचांगनुसार, ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सुकर्मा योगाचा शुभ संयोग जुळून येणार आहे. सुकर्मा योग सकाळी ते रात्री 10 वाजून 54 मिनिटांपर्यंत असणार आहे. या व्यतिरिक्त ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे. तर, सकाळी 8 वाजून 31 मिनिटांपर्यंत शिवास योगदेखील असणार आहे.
शनि जयंतीचे उपाय
- शनी जयंतीच्या दिवशी लोखंडाचा त्रिशूळ भगवान शंकर आणि भगवान भैरवाला किंवा मंदिराला अर्पित करा. यामुळे तुमच्या करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होतील.
- जुने चपला-बूटं शनी जयंतीच्या दिवशी चौथऱ्यावर ठेवा. तसेच, गरिबांना कपडे, अन्नदान करा.
- शनी जयंतीच्या दिवशी 10 बदाम घेऊन हनुमान मंदिरात जा. तसेच, 5 बदाम तिथे ठेवा आणि 5 बदाम घरी आणून लाल वस्त्रात बांधून धनाच्या जागी ठेवा. यामुळे तुमच्या धनसंपत्तीत वाढ होईल.
- काळ्या उडदाची डाळ बारीक करून त्यापासून बनलेल्या पीठाचे गोळे तयार करा. आणि माशांना खाऊ घाला.
- शनी जयंतीच्या दिवशी माकडांना काळे चणे, गूळ आणि केळी खाऊ घाला.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)