ट्रेंडिंग
Shani Jayanti 2025 : शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही 'ही' कामे करु नका; अन्यथा...आयुष्यभरासाठी भोगाल कर्माची फळं
Shani Jayanti 2025 : नुकतीच शनी जयंती जवळ येणार आहे. अशा वेळी काही कामे चुकूनही करु नयेत. यामुळे शनी देवाची वाईट दृष्टी तुमच्यावर पडू शकते.
Shani Jayanti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीदेवाला न्यायदेवता आणि कर्मफळदाता मानतात. शनीची (Shani Dev) ज्या लोकांवर कृपा बरसते त्यांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदते. तर, ज्या राशींच्या लोकांवर शनीची करडी नजर असते त्या लोकांना शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागतो. नुकतीच शनी जयंती (Shani Jayanti) जवळ येणार आहे. अशा वेळी काही कामे चुकूनही करु नयेत. यामुळे शनी देवाची वाईट दृष्टी तुमच्यावर पडू शकते.
शनी जयंती कधी?
वैदिक पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्या तिथीची सुरुवात 26 मे 2025 रोजी दुपारी 12 वाजून 11 मिनिटांनी होणार आहे. तर, या तिथीची समाप्ती पुढच्या दिवशी म्हणजेच 27 मे रोजी रात्री 8 वाजून 31 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने शनी जयंती 27 मे रोजी साजरी केली जाणार आहे.
शनी जयंतीच्या दिवशी चुकूनही 'ही' कामे करु नका
कोणाचाही अपमान करु नका
शनीला न्यायदेवता म्हणतात, त्यामुळे शनीला अन्याय अजिबात आवड नाही. यासाठीच शनी जयंतीच्या दिवशी कोणालाही चुकून कोण्या गरिबाचा अपमान करु नका, गरजूंचा अपमान करु नका. यामुळे शनीदेव नाराज होतात. तसेच, शनीच्या वक्रदृष्टीचा सामना करावा लागू शकतो.
तामसिक आहार घेऊ नका
शनी जयंतीच्या दिवशी सात्विक आहार घेणं शुभ मानलं जातं. या दिवशी मांसाहारी पदार्थांपासून दूर राहा. मान्यतेनुसार, यामुळे शनीदेव नाराज होतात. आणि नकारात्मक ऊर्जा पसरते.
केस आणि नखं कापू नका
मान्यतेनुसार, शनी जयंतीच्या दिवशी केस आणि नखं कापणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे या दिवशी यामागे कोणतंही वैज्ञानिक कारण नसलं तरी केस आणि नखं कापू नका.
तेलाचं दान करताना सावधानता बाळगा
शनीदेवाला तेल चढवणं आणि दान करणं फार शुभ मानलं जातं. मात्र, तेलाचं दान करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कधीही खराब झालेलं तेल वापरुन दान करु नका. नेहमी शुद्ध तेलाचा वापर करा.
शनी जयंतीच्या दिवशी काय करावं?
शनी जयंतीच्या दिवशी पूजा करावी. तसेच, शनीला काळे तीळ, मोहरीचं तेल आणि नीळ्या रंगाचं फूल अर्पण करावं. शनी चालीसाचं पठण करावं आणि गरिबांना दान द्यावं. यामुळे शनीदेव प्रसन्न होतात. आणि जीवनात सुख समृद्धी नांदते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :