Shani Amavasya 2025: शनि अमावस्या काही दिवसातंच.. सोबत सूर्यग्रहणही.. महादुर्लभ योगायोग! पितृदोष, समस्या संपतील, फक्त 'हे' 5 उपाय करा..
Shani Amavasya 2025: ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून यंदाची शनि अमावस्या खूप महत्त्वाची आहे. विविध समस्या आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे,
Shani Amavasya 2025: हिंदू पंचागानुसार, एका वर्षात 12 अमावस्या असतात. ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून यंदाची फाल्गुन अमावस्या म्हणजेच शनि अमावस्या खूप महत्त्वाची आहे. पुराणानुसार पितृदोषापासून तसेच विविध समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे, हा दिवस शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी खूप शुभ मानला जातो, ज्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा ढैय्याचा प्रभाव आहे. त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी काही गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. या विशेष दिवसाबद्द्ल सांगायचं झालं तर, शनि अमावस्येसोबतच सूर्यग्रहणही होणार आहे, ज्यामुळे या दिवसांचं महत्त्व आणखी वाढलंय. ज्योतिषशास्त्रानुसार हा एक दुर्लभ योगायोग मानला जातोय. या दिवशी काही खास उपाय केल्यास अनेकांना विविध समस्यांतून मुक्ती मिळू शकते.
शनि अमावस्या, सूर्यग्रहण कधी आहे?
वैदिक दिनदर्शिकेनुसार, शनि अमावस्या तिथी 28 मार्च रोजी संध्याकाळी 07:55 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 मार्चला संध्याकाळी 04:27 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदय तिथीनुसार 29 मार्च रोजी शनि अमावस्या असणार आहे. तर भारतीय वेळेनुसार, वर्षातील हे पहिले सूर्य ग्रहण दुपारी 2.21 वाजल्यापासून ते सायंकाळी 6.14 वाजेपर्यंत असणार आहे. हे सबर्यग्रहण खंडग्रास असणार आहे. मीन राशी आणि उत्तर भाद्रपद नक्षत्रात हे ग्रहण लागणार आहे या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्न, वस्त्र आणि पैसा दान केल्याने पुण्य प्राप्त होते. काही विशेष उपाय केल्यास पितृदेवता प्रसन्न होतात. पितृदोषांपासून मुक्ती देणारा दिवस आहे.
ट्रेंडिंग
हे उपाय करा, पितरांचा आशीर्वाद मिळेल.
पितरांना प्रसन्न करण्यासाठी - शनि अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करा. अखंड फळे, फुले, काळे तीळ इत्यादी अवश्य अर्पण करा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा. हात जोडून 11 परिक्रमा करावी.
पितृदोषापासून मुक्ती - शनि अमावस्येच्या दिवशी स्वच्छ भांडे घेऊन त्यात पाणी, काळे तीळ आणि कुशा मिसळून पितरांचे ध्यान करावे, असे मानले जाते. यानंतर प्रत्येक अमावस्या तिथीला पितरांच्या नावाने दान करावे. वर्षभर असे केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते.
करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी - खूप प्रयत्न करूनही तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळत नसेल, तर चैत्र अमावस्येच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांकडून एक रुपयाचे नाणे घेऊन मंदिरात दान करा. प्रत्येक अमावस्येला हे करा. असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि करिअर आणि व्यवसायात प्रगती होते असे मानले जाते.
संतप्त पितरांना शांत करण्यासाठी - शनि अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून पितरांचे स्मरण करून तर्पण करावे. असे केल्याने संतप्त पितर प्रसन्न होतात.
पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर शनि अमावस्येला कुत्रा, गाय आणि कावळा खाऊ घाला. असे केल्याने पितृदोषापासून आराम मिळतो. तसेच या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. वर्षभर प्रत्येक अमावस्येला हे करा.
हेही वाचा>>
Shani Transit 2025: 29 मार्च तारीख चमत्कारिक! 7 ग्रहांचा भव्य महासंयोग! 12 राशींवर काय परिणाम होणार? कोणाचं भाग्य उजळणार?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)