Papmochani Ekadashi 2025: पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी उद्याचा दिवस उत्तम! पापमोचनी एकादशीचे महत्त्व काय? व्रत करण्याची पद्धत, पूजेची वेळ वाचा..
Papmochani Ekadashi 2025: पापमोचनी एकादशीचे व्रत का केले जाते? माणसाला खरंच पापांपासून मुक्ती मिळते? यामागील धार्मिक महत्त्व काय? हिंदू धर्मात म्हटलंय..

Papmochani Ekadashi 2025: फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पापमोचनी एकादशीचे व्रत करण्याची परंपरा आहे. एकादशी व्रताचे हिंदी धर्मात विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. यावर्षी पापमोचनी एकादशीचे व्रत 25 मार्च 2025 रोजी केले जाणार आहे. पण पापमोचनी एकादशीला आपण उपवास का ठेवतो हे तुम्हाला माहिती आहे का? पापमोचनी एकादशीचे महत्त्व जाणून घ्या..
हिंदू धर्मात या एकादशीचे विशेष महत्त्व
हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. एकादशी व्रत महिन्यातून दोनदा केले जाते, एकदा कृष्ण पक्षात आणि दुसरे शुक्ल पक्षात. साधारणपणे वर्षभरात 24 एकादशी असतात, पण जेव्हा अधिकमास किंवा मलमास येतात तेव्हा त्यांची संख्या 23 होते. पापमोचनी एकादशीचे व्रत फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते. यावर्षी पापमोचनी एकादशीचे व्रत 25 मार्च 2025 रोजी केले जाणार आहे.
पापमोचनी एकादशी नेमकी कधी आहे?
चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 25 मार्च रोजी पहाटे 5:05 वाजता असेल. या एकादशी तिथीची समाप्ती 26 मार्चला पहाटे 3:45 वाजता होईल. अशा स्थितीत उदयतिथीनुसार 25 मार्च 2025 रोजी पापमोचनी एकादशीचे व्रत केले जाणार आहे.
पापमोचनी एकादशीचे महत्त्व काय?
पौराणिक मान्यतेनुसार पापमोचनी एकादशीचे व्रत भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी आणि पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाळले जाते. पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने माणसाला मोक्षप्राप्ती होते आणि जीवनात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. पापमोचनी एकादशीचे व्रत आणि शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
माणसाची सर्व पापे नष्ट होतात?
धार्मिक श्रद्धेनुसार नावावरूनच स्पष्ट होते की पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात. पापमोचनी एकादशीच्या दिवशी व्रत पाळण्यासोबतच लक्ष्मी-नारायणाची पूजा योग्य प्रकारे करावी. याशिवाय पापमोचनी एकादशीची व्रत कथाही वाचावी किंवा ऐकावी. असे मानले जाते की असे केल्याने घरात धन, सुख-समृद्धी सदैव राहते.
मोक्षाचा मार्ग खुला करते?
धार्मिक श्रद्धेनुसार, पापमोचनी एकादशी साधकाला त्याच्या सर्व पापांपासून मुक्त करते आणि त्याच्यासाठी मोक्षाचा मार्ग खुला करते. हे व्रत केल्याने अनेक जन्मांची पापे नष्ट होतात. याशिवाय पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने माणसाला सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन आणि गायींचे दान करण्यापेक्षा अधिक पुण्य प्राप्त होते.
वैष्णव पापमोचिनी एकादशी व्रत मुहूर्त आणि पारण वेळ
एकादशी तिथीची सुरुवात - 25 मार्च 2025 सकाळी 5:05 वाजता
एकादशी तिथी समाप्त होईल - 26 मार्च पहाटे 3:45 वाजता
वैष्णव पापमोचिनी एकादशी व्रत दिनांक- 26 मार्च 2025
वैष्णव पापमोचिनी एकादशी व्रत - 27 मार्च 2025
वैष्णव एकादशीची पारण वेळ - 27 मार्च रोजी सकाळी 6:37 ते 9:04
हेही वाचा>>
Shani Sade Sati: टेन्शन संपायला अवघे 5 दिवस शिल्लक! 29 मार्चला शनीचं मोठं संक्रमण, 'या' राशींची साडेसाती संपतेय, तर 'या' राशींची सुरू होणार..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
