Horoscope Today 16 May 2025: आजचा संकष्टी चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी भाग्यशाली? श्रीगणेशाची कृपा कोणावर? 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा
Horoscope Today 16 May 2025: आजचा संकष्टी चतुर्थीचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
Horoscope Today 16 May 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 16 मे 2025, आजचा वार शुक्रवार आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीसाठी आज हातून एखादे चांगले लिखाण घडेल, परंतु सतत दुधा मनस्थिती राहिल्यामुळे कामाची गती थोडी मंदावेल.
ट्रेंडिंग
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज आपल्या प्रतिष्ठेला कोणताही धक्का लागणार नाही याची काळजी घ्या, महिला जास्त खर्चिक बनतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमच्या मनाप्रमाणे मनाच्या कल्पना थोड्या टोकदार होतील, परंतु स्वाभिमान आणि अहंकार यामध्ये पुसटशी लक्ष्मण रेषा आहे हे लक्षात ठेवा
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज ज्यांच्या नोकऱ्या नवीन आहेत, त्यांना वरिष्ठांच्या गैरमर्जीला तोंड द्यावे लागेल
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज जेवढे काम कराल, त्यामानाने व्यवसायात लाभ कमी मिळेल कष्टाचे डोंगर उपसाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज घरामध्ये थोड्याशा कारणाने वाद होतील, वातावरण ढवळून निघेल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज तब्येत सांभाळावी लागेल, ज्यांना पित्ताचा उष्णतेचा त्रास आहे त्यांनी सांभाळून राहावे
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज परदेशी प्रवास घडतील, वडिलोपार्जित इस्टेटच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज एखादे घर बांधायला घेतले असेल, तर ती कामे पूर्ण होतील आर्थिक गुंतवणूक कराल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज महिला घरामध्ये वेगवेगळ्या पदार्थ करण्यात गुंतून जातील, एखाद्या निरीक्षण परीक्षण फार चांगल्या पद्धतीने कराल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज आवडत्या गोष्टीचा सखोल अभ्यास करायला उच्चपदस्थ व्यक्तीचा सहवास लाभेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज सहवासातील वृद्ध व्यक्तींचा सल्ला अवश्य विचारात घ्या, धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी राहाल.
हेही वाचा:
Lucky Zodiac Sign: 16 मे तारीख चमत्कारिक! 'या' 5 राशींचे सोन्याचे दिवस येणार, आर्थिक लाभ, प्रगती, चांगली बातमी मिळेल
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)