Astrology : आज द्विपुष्कर योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींना मिळणार कर्माचं फळ, शनिदेव होणार प्रसन्न

Astrology Panchang Yog 7 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

Astrology Panchang Yog 7 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 7 जूनचा दिवस. म्हणजेच आजचा वार शनिवार. ज्योतिष शास्त्रात आजचा दिवस हा शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. तसेच, आज चंद्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास आहे. तसेच, आज समसप्तक योगासह अनेक शुभ योग जुळून येतील. तसेच, आज सर्वार्थ सिद्धी योगासह द्विपुष्कर योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस अनेक अर्थांने खास असणार आहे. 

Continues below advertisement

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुम्हाला विकेंडचा आनंद घेता येईल. तसेच, मानसिक शांती मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढले. कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जावं लागू शकतं. अशा वेळी वाहनाचा सांभाळून वापर करा. तसेच, मनासारखं काम केल्याचं समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन ठरु शकतो. अशा वेळी प्रवासाचा आनंद घ्याल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. मुलं फार खुश असतील. नवीन गोष्टी शिकता येतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमचं मन प्रसन्न असेल. तसेच, तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. अथक परिश्रमानंतर तुमची आर्थिक स्थिती पूर्ववत येईल. त्यामुळे पैशांचं मोल तुम्हाला जाणवेल. गरजूंसाठी दानशूर वृत्ती दिसून येईल. आरोग्याची काळजी घ्या. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला कोणाचाही व्यत्यय जाणवणार नाही. तसेच, तुमचा व्यवसाय देखील सुरळीत चालेल. आज वीकेंड असल्या कारणाने कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त ऑर्डर्स मिळतील. तसेच, खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. बजेटची काळजी घ्या. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, शनिदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे कोणतंही काम करताना प्रामाणिकपणाने करा. त्याचं तुम्हाला फळ नक्की मिळेल. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Horoscope Today 7 June 2025 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 3 राशींवर प्रसन्न असणार शनि महाराज; वाचा आजचे राशीभविष्य

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola
OSZAR »