Astrology : आज वृद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; कन्यासह 'या' 5 राशींच्या पाठीशी असणार गणराया, संपत्तीत भरभराट
Astrology Panchang Yog 25 June 2025 : वैदिक शास्त्रानुसार, आजच्या शुभ दिवसाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
Astrology Panchang Yog 25 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 25 जूनचा दिवस आहे. म्हणजेच आजचा वार बुधवार हा गणेशाला (Lord Ganesh) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी ज्येष्ठ अमावस्या देखील असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. तसेच, आज चंद्राने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. आजच्या दिवशी गजकेसरी योग, मृगशिरा आणि आर्द्रा नक्षत्रासह अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक शास्त्रानुसार, आजच्या शुभ दिवसाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
ट्रेंडिंग
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुम्हाला उत्पन्नाचे अनेक मार्ग सापडतील. तसेच, फॅमिली बिझनेस तुम्ही पुढे नेऊ शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांचा देखील सपोर्ट मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांवर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला आज अनेक शुभवार्ता ऐकायला मिळतील. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसेल. आज समाजात देखील तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुमच्या जुन्या चुकांमधून तुम्ही बोध घ्याल. तसेच, तुमचे साहस दिसून येईल. आज कोणतंही काम हाती घेताना जिद्द आणि चिकाटीने करा. भाषा शैलीचा चांगला वापर कराल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तसेच, गणपतीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. आज वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमची सगळी कामे पूर्ण होतील. तसेच, ज्यांना कोणाला नोकरीत ट्रान्सफर हवी असल्यास हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे.
तूळ रास (Libra Horoscope)
आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी फार भाग्यशाली असणार आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, पैशांच्या गुंतवणुकीकडे तुमचा कल असेल. समाजात तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. फक्त कोणाकडूनही पैसे उधारी घेऊ नका. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, गणरायाची तुमच्यावर विशेष कृपा असेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस उमेदीचा असणार आहे. आज तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, तुम्ही जी मेहनत घेत आहात त्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. तुमची मेहनत वाया जाणार नाही. कामाच्या बाबतीत प्रामाणिक राहा. तसेच, समाजकार्यात देखील सक्रिय राहण्याची गरज आहे. तुमच्या आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :